Connect with us

मराठी कलाकार

भूषणने प्यायली १२ कच्ची अंडी तर सईने बनवले शेणाचे लाडू

Television

भूषणने प्यायली १२ कच्ची अंडी तर सईने बनवले शेणाचे लाडू

दिवसेंदिवस बिगबॉसच्या घरातील सदस्यांना मिळणारी टास्कची लेव्हल सध्या हळूहळू वाढत चाललेली दिसत आहे. बिगबॉसने दिलेली टास्कचं असतात मुळात एकमेकांवर कुरघोडी करायला लावणारी. एकमेकांमधील स्पर्धा वाढवणारी हि टास्क सहभागी सदस्यांमध्ये दुरावा निर्माण करताना दिसतात. मागील भागामधील खेळ मांडला ह्या टास्कमुळे घरात झालेला राडा आपण चाहत्यांनी चांगलाच अनुभवला होता. आज घरातील 26वा दिवस होता. सुरुवातीला आपल्याला सई आणि मेघा ह्या दोन मैत्रिणींमध्ये काहीतरी कुजबुज ऐकायला मिळाली. घरातील सदस्यांना मग एका टेबलावर बऱ्याच वस्तू ठेवलेल्या आढळल्या. ग्रासकटर, शेणाच्या बादल्या, केक, खूप सारी अंडी, कारली, हॅन्डग्लोव्ज अशा एक ना अनेक वस्तू आपल्याला बघायला दिसल्या.

 

पुढे खरी गंमत होती, कारण ह्या वस्तू सदस्यांना आजच्या टास्कसाठी वापराव्या लागणार होत्या. सदस्यच एकमेकांना काहीतरी भन्नाट टास्क देणार होते आणि त्यांना ते पूर्णही करावे लागणार होते. सुरुवात झाली ती आस्ताद आणि भूषण पासून आस्तादने भूषणला एका ग्लास मध्ये तब्बल बारा कच्ची अंडी फोडून दिली आणि ती त्याला पूर्ण प्यायला लावली. मग भूषणने अनिल थत्ते ह्यांना साडेतीन चपात्या पाणी न पिता खायला सांगितल्या. रेशमने सईला एका मिनटात शेणाचे ८५ लाडू बनवायला लावले. एका बाऊल मधील अंडी स्वतःच्या दातांनी फोडण्याचं टास्क जुईने मेघाला दिलं होतं. रेशमने ऋतुजाला उलट्या हातांनी ग्रासकटर पकडून ठेवलेल्या कारल्याचे प्रत्येकी 5 तुकडे करायला लावले. तीनेसुद्धा इथे मोठ्या चलाखीने हे टास्क पूर्ण केलं. आस्तादने जुईला पूर्ण ३० सेकंद पाण्याखालून डोकं न वर काढण्याचं टास्क दिलं होतं. आता ह्या टास्कमुळे दिवसेंदिवस खेळातील रंजकता वाढत चालत असल्याचं दिसतंय.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top