Connect with us

मराठी कलाकार

‘बिगबॉसच्या घरात परत न्या’ सिक्रेट रूम मधील राजेश ढसाढसा रडला

Television

‘बिगबॉसच्या घरात परत न्या’ सिक्रेट रूम मधील राजेश ढसाढसा रडला

गेल्या आठवड्यातील टास्कमुळे बिगबॉसच्या घरात बरीच वादावादी, बाचाबाची आणि खेळातील रंगत वाढत चालली असल्याचं दिसतंय. हे भन्नाट टास्क फिनिश केल्यानंतर आज विकेन्डच्या शेवटी शेवटी घरातील माहोल जरा थंड जाणवला. तरीही झालेल्या गोष्टीमुळे, टास्कमधील चुकांमुळे आपल्या सहकाऱ्यांसोबत स्पर्धकांची तू तू मै मै आपल्याला बघायला मिळाली. मेघा आणि सई घरात एकत्र बसलेल्या असतांना सई मेघाला मागील दोन, चार दिवसातील तिच्याकडून घडलेल्या चुका सांगत होती. यावेळी तिच्या मी मी करण्याबद्दल, फ्रेंडशिपवर टोमणे मारण्याबद्दल सईने तिला चांगलंच सुनावलं.

दरम्यान एका सीनदरम्यान सिक्रेटरूम मधून राजेश आपल्याला दिसला. तो कॅमेऱ्याकडे पाहून बिगबॉसशी बोलत होता. ह्यावेळी तो अक्षरशः ढसाढसा रडत होता. “मला ह्या खोलीत आता राहवत नसून, प्लिज त्या बिगबॉसच्या घरात पाठवा” अशी विनंती तो कॅमेऱ्यासमोर आपल्याला करताना दिसला. घरातील आऊ उषा नाडकर्णी, अनिल थत्तेंनी खेळ मांडला टास्क दरम्यान केलेल्या टाळाटाळीबद्दल जुई, पुष्कर, ऋतुजा यांच्यासोबत थट्टा करताना दिसल्या. पुढे मग पुष्करने बिगबॉसचं आलेलं पत्र सदस्यांना वाचून दाखवलं. ह्या आठवड्यात सर्वच सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं त्यात म्हटलं होतं. सर्वांसाठी एक लग्झरी बजेट बिगबॉसने ठेवलं होत. आताशी कुठे सदस्यांना खेळातील गांभीर्य कळत असून पुढेही सर्वजण खेळ गांभीर्याने घेतील असंही बिगबॉसने पत्रात लिहिलं होतं.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top