Connect with us

मराठी कलाकार

थेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण

Television

थेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण

बिगबॉसच्या घरापासून दूर तब्बल आठवडाभर सिक्रेट रूम मध्ये राहिल्यानंतर राजेश सोमवारी बाहेर आलेला दिसला. त्याच्या बाहेर येण्याने घरातील सदस्यांना आनंद झालेला दिसत होता. सर्वानी आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. स्मिता, आस्ताद, भूषण, सुशांत ह्यांना तर आनंद झालेला होताच पण दुसरीकडे सई, मेघ आणि पुष्कर थोडेसे नाखूष वाटले. त्यांनी राजेशचं स्वागत केलं खरं पण त्याची परत रेशीमसोबत वाढत असलेली जवळीक पाहून ते नाराज होते. आठवड्याच्या शेवटी कुणीतरी एक जण घराबाहेर पडणार होता, आणि आपल्याला पत्रकार अनिल थत्ते ह्या शो मधून एक्झिट घेताना दिसले. ते बाहेर पडल्यानंतर सोमवारच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना त्यांची आठवण असं दिसत होतं. राजेशच्या घरात वापस येण्याने पुन्हा एकदा घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले.

रेशम तर राजेशला बघून खूपच खुश वाटत होती. ह्यावेळी राजेशने पुन्हा एकदा रेशमला प्रेमाची कबुली दिली. तुझ्या अशा वागण्याने तुझ्या पत्नीला काय वाटेल असं रेशमने राजेशला विचारलं असता माझी पत्नी डिम्पल समजूतदार असून ती आपल्यामधल्या फीलिंग्स समजून घेईल असं तो म्हणाला. घरात निर्माण झालेल्या ह्या स्थितीत आता अजून मसाला आपल्याला ह्यापुढे बघायला मिळणार असं दिसतंय. आजच्या ३१ व्या एपिसोड मध्ये आता नवीन आठवडा आणि नवीन टास्क्स मुळे सुरु झालेली गडबड आपल्याला दिसली. थेंबे थेंबे तळे साचे हा टास्क सध्या घरात चालू आहे. ह्या टास्कमध्ये दोन्ही ग्रुप्सना बादलीने पाणी भरून जवळच्या टाक्यात ओतायचं आहे आणि विरुद्ध टीमला ते करण्यापासून त्यांना रोखायचं आहे.दोन्ही ग्रुप्स सुरुवातीला स्ट्रॅटेजी आखण्यात बिझी दिसले. पुढे हा टास्क चालू असताना आज आपल्याला स्मिता आणि सईमध्ये थोडस लढाई स्वरूपाची झटपट आपल्याला बघायला मिळाली.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top