Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री। आस्तादचं बर्थडे सेलिब्रेशन

Television

बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री। आस्तादचं बर्थडे सेलिब्रेशन

नुकतीच बिगबॉस मराठीच्या ह्या आठवड्याची नॉमिनेशन लिस्ट जाहीर झाली असून ह्यात तब्बल 7 सदस्यांची नावं आहेत. सई लोकूर, पुष्कर जोग, रेशम टिपणीस, राजेश श्रुंगारपुरे, जुई गडकरी,सुशांत शेलार, त्रुतुजा धर्माधिकारी हे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. आता ह्यापैकी घरात राहणार कोण? आणि बाहेर कोणता सदस्य जाणार ह्याची चुरस वाढली आहे. ह्या आठवड्यात आपल्याला थेंबे थेंबे तळे साचे हा टास्क पार पडतांना दिसला. राजेशचा कमबॅक, रेशमची वागणुक, पंचिंग बॅगवर फटके मारून राग काढणारे सदस्य असा बराच रंजक भाग चाहत्यांना बघायला मिळाला. घरातून ह्यावेळी कोण बाहेर पडायला हवं? ह्यावर चाहत्यांची मतं घेतली असता राजेश आणि रेशमवर फॅन्सचा रोष दिसून येतो. तर दुसरीकडे सई, त्रुतुजा ह्यांच्या बाजूने फॅन्सचा सपोर्ट असल्याचं आपल्याला दिसतंय.

आजच्या ह्या एपिसोड ३३ मध्ये घरातील वातावरण जरा प्रफुल्लित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. ह्याला कारण होतं ते म्हणजे आज होता आस्तादचा बर्थडे! घरात आज जणू काही सर्वजण नाचण्याच्याच माहोलमध्ये डुबून गेले होते. आस्तादच्या आईने पाठवलेला केक ह्यावेळी आस्तादपुढे ठेवण्यात आला. हॅपी बर्थडे डिअर आस्ताद म्हणत सगळ्यांनी दिवस सेलिब्रेट केला. घरातील जेष्ठ सदस्य असलेल्या आऊंनी आस्तादला सर्वप्रथम केक भरवला. ह्या भागात शेवटी दडलं होतं ते सर्वांसाठी एक मोठ्ठ असं सरप्राईज. आजच्या ह्या भागात शेवटी आपल्याला वाईल्डकार्डद्वारे एक स्पेशल एंट्री घरात होताना दिसली. सर्व सदस्यांनी एकदम जोमात ह्या नवीन सदस्याचं स्वागत केलं. “कहते है मुझको हवाहवाई” ह्या गाण्यावर एंट्री केलेली हि अभिनेत्री कोण? तर ती होती हर्षदा खानविलकर! हो!! आता हर्षदा आपल्याला इथून पुढे घरातील एके सदस्याच्या रुपात दिसणार आहे. अस्तादच्या बर्थडेला हर्षदाने घरात केलेली जोरदार एंट्री हे बिगबॉसने आपल्या सर्वांना दिलेलं गिफ्टचं म्हणावं लागेल.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top