Connect with us

मराठी कलाकार

राजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम

Television

राजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम

बिगबॉस मराठीचा कालचा भाग चांगलाच पैसावसुल राहिला. काल आपल्याला सर्व सदस्य चक्क आनंदी वाटत होते. आणि त्याला कारणही तसंच होतं कारण एकीकडे आस्तादचा बर्थडे होता आणि सरशेवटी आपल्याला बघायला मिळाली ती घराची नवी सदस्य बनलेली नवी पाहुणी! पुढचं पाऊल फेम अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर आता इथून पुढच्या प्रवासात आपल्याला बघायला मिळणार आहे. घरातील सर्व आवाजांसोबत आता चाहत्यांना अक्कासाहेबांचा कणखर आवाज ऐकायला मिळणार आहे. आज सदस्यांच्या घरातील ३४ वा दिवस होता. नेहमीप्रमाणे आजही सदस्यांना टास्कही मिळालं आणि आपल्याला त्रुतुजा आणि हर्षदा खानविलकर ह्यांच्यात शाब्दिक चकमक बघायला मिळाली. हेच कमी कि काय तर आजच्या भागात आपल्याला बिगबॉसने राजेश आणि सुशांतला घरातील कामं करण्याची शिक्षा पण सुनावली म्हणे!

काल नवीन पाहुणीचं स्वागत केल्यानंतर, आज सर्व नित्यनेमाप्रमाणे चालू झालं. आजच्या टास्कमध्ये आपल्याला दोन भागात विभागलेले मातीचे ढाचे दिसले. एका ग्रुपमधील सदस्य स्वतःच्या ढाच्यात फुलं रोवतांना तर आपल्या विरुद्ध ग्रुपच्या ढाच्यातील रोवलेली फुले उखडून फेकताना दिसले. दरम्यान हे टास्क चालू असतांना त्रुतुजा आणि हर्षदा खानविलकर ह्यांच्यात शाब्दिक चढाओढ झालेली आपल्याला दिसली. नेहमीप्रमाणे आक्रमक झालेल्या ऋतुजाला “राग आवर, टास्क आहे तर टास्कसारखं खेळ” असं भारदस्त आवाजात सुनावलं. पुढे मग सर्व सदस्य सोबत बसल्यानंतर बिगबॉसने घरातील सदस्यांचा समाचार घेतला. खेळातील आक्रमकता वाढत असून नुसतं शक्तीनिशी सदस्य टास्क करत असल्याचं बिगबॉसने सांगितलं. ह्या बद्दल राजेश आणि सुशांतला बिगबॉसने आपला पुढील आदेश येईपर्यंत घरातील कामं करण्याची शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे त्या दोघांना कामं करतांना इतर कोणाचीही मदत मिळणार नाहीये.

Comments

More in Television

To Top