Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी। आस्ताद अडकला अडचणीत?

Television

बिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी। आस्ताद अडकला अडचणीत?

एका फ्रेश टास्कसोबत आपल्याला बिगबॉसच्या नव्या आठवड्याची सुरुवात होताना आज दिसली. घरातील आजवर पार पडलेली टास्कस सदस्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणारी, आणि एकमेकांवर कुरघोडी करायला लावणारीच होती. पण, आजच्या ह्या एपिसोडमध्ये बिगबॉसने दिलेलं टास्क काहीसं इंटरेस्टिंग होतं असं दिसतंय. एरव्ही एनर्जेटिक असणारा आस्ताद आपल्याला ह्या भागात कसल्यातरी टेन्शनमुळे सिरीयस असलेला दिसला. कालवर घरात जी शब्दांची चकमक आपल्याला बघायला मिळत होती तीसुद्धा आज कमी झालेली वाटत होती.

आज बिगबॉसच्या घरातील दिवस 3७ वा होता. सुरुवातीपासूनच आस्ताद कसल्यातरी अडचणीत आहे असं वाटत होतं.  ह्यावेळी आस्ताद आपल्याला “तुम्ही सगळे मला निरोप द्या प्लिज सांगत होतो रोज, आता तीच लग्न ठरवतायंत” असं बोलतांना दिसून आला. त्याचा नेमका प्रॉब्लेम जरी आपल्याला कळू शकला नसला तरी मला ह्या घरातून तुम्ही निरोप द्या असाच सूर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. पुढे सर्व सदस्य एकत्र जमल्यावर ह्या आठवड्याचं टास्क सुशांत आपल्याला वाचून दाखवताना दिसला. दरम्यान आजवरच्या टास्कमध्ये शक्ती आणि युक्तीचा चलाखीने वापर करण्याचे आदेश होते पण आपल्याला शक्तीचाच जास्त वापर होतांना दिसला असं बिगबॉसचं म्हणणं होतं. त्यामुळेच ह्या आठवड्यात युक्तीची शक्ती तपासण्याचं टास्क बिगबॉसने सदस्यांना दिलेलं आहे. टास्कचं नाव मर्डर मिस्टरी असून ह्यात घरात काही खून होणार आहेत. हे खून शारीरिक नसून सांकेतिक असतील. ह्या टास्कमध्ये आपल्याला कोणीतरी खुनी, कुणी गुप्तहेर तर काही सामान्य नागरिक असणार आहेत. आजपासूनच ह्या टास्कची सुरुवात होणार असून पुढे हे टास्क कसं रंजक होत जाणार हे पाहायला आपल्याला पुढील एपिसोड्सची वाट बघावी लागणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top