Connect with us

मराठी कलाकार

मर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार? बिगबॉसने दिले SR चे संकेत

Television

मर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार? बिगबॉसने दिले SR चे संकेत

मर्डर मिस्ट्री! नाव एवढं गूढ मात्र आजवरच्या बिगबॉसच्या घरातील टास्क्सपैकी धक्काबुक्की, शाब्दिक चकमक न होता पार पडत आलेलं हे टास्क होत असच आपल्याला म्हणावं लागेल. ह्या टास्क दरम्यान आपल्याला सगळेच सदस्य थोडेसे बुचकळ्यात पडल्यागत वाटत होते. आस्तादला बिगबॉसने खुनी बनवून काही सांकेतिक खून करण्यास सांगितलं होतं. हे टास्क जर तो पूर्ण करू शकला तर पुढील आठवड्यात तो नॉमीनेशनपासून वाचणार आहे. ह्या टास्कमध्ये आपल्याला घरातील काही सदस्य गुप्तहेर तर काही सर्वसामान्य नागरिक म्हणून वावरणार होते. आस्तादने खुन करण्याचं टास्क केलं आणि तो सगळ्यांच्या नजरेआड आहे असं वाटत होतं पण, मेघाच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या होत्या आणि आस्तादच गुन्हेगार आहे हे सर्वांसमोर येणार होतं, पण बिगबॉसने इथे डाव पालटवून लावत मेघाला बोलावून घेत तिलाच खुनी व्हायला भाग पाडलं आणि आस्तादची साथ द्यायला लावली. खरी कमाल म्हणजे मेघाने हे खून इतक्या सहजरीत्या केले कि आपण पाहतच राहिलो. एकंदरीत मेघाने हे टास्क खूप चांगल्या प्रकारे खेळल्याचे आपल्याला दिसून येते.

आता आजच्या ह्या एपिसोड ३९ मध्ये आपल्याला सर्व सदस्यांसमोर कोर्ट भरल्याचं दिसून येतंय. ह्याच कोर्टात आता गुप्तहेर असलेले सुशांत आणि स्मिता ह्यांना नेमके खुनी ओळखून काढायचे आहेत. सुशांतसुद्धा आपल्याला काही पुराव्यानिशी आस्ताद आणि मेघावर आरोप करताना दिसला. पण दुसरीकडे गुप्तहेर कुठेतरी खुनी ओळखण्यात अपयशी ठरतात का? असंच सध्याचं घरातील चित्र आहे. आणि जर असं झालं तर आस्ताद आणि मेघा हे टास्क यशस्वीपणे पूर्ण करतील आणि मग बिगबॉस केवळ आस्तादलाच पुढील आठवड्यासाठी सेफ करनार कि मेघालासुद्धा हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण मेघाने खूप चलाखीने हे खून केले होते. पुढे स्मिता गोंदकर आपल्याला सुशांतने तिच्यासोबत केलेल्या वर्तनामुळे नाराज झाल्याचं आपल्याला दिसलं. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या एंट्रीचे संकेत आपल्याला बिगबॉसने दिले. एक स्पेशल लक्झरी बजेट ज्यावर SR असं लिहिलेलं होत ते स्मिता आणि पुष्करला स्टोअर रूम मध्ये आढळून आलं

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top