Connect with us

मराठी कलाकार

सई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद! “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क

Television

सई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद! “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क

बिगबॉसच्या घरात होत काय तर काही सदस्य इथे राहायला येतात. त्यांना काही टास्कस बिगबॉसने दिलेले असतात. हे टास्क पूर्ण करत, खेळ चांगला खेळत शेवटपर्यंत स्वतःला ह्या घरात टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत असतो. जो सदस्य हे करण्यास असमर्थ ठरला त्याचं होतं ते एलिमीनेशन! म्हणजेच त्याला ह्या घरातून जावं लागतं. आता सध्या सुरु असलेल्या एपिसोड्स दरम्यान घरातील एक सदस्याला बिगबॉसने एलिमीनेट तर केलं पण, तो सदस्य घराच्या बाहेरच गेला नाही. त्या सदस्याचं नाव आहे मेघा धाडे! अगदी खरंच ह्या मागील आठवड्यात घरात मर्डर मिस्टरीचा खेळ पार पडला. ह्यानंतर नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली. सरतेशेवटी महेश मांजरेकरांसमोर कठड्यात उभे होते ते सुशांत, सई आणि मेघा. ह्यातील सुशांत आणि सईला सेफ केल्या गेल्यामुळे मेघा एकमेव सदस्य होती जी एलिमीनेशनला पात्र ठरली. ह्यानंतर तर आऊ, सई, पुष्कर ह्यांना रडूच कोसळलं. हा होता घरातील सदस्यांमधील सीन. पण, शो बघणाऱ्या चाहत्यांना माहिती होतं कि ह्या आठवड्यात एलिमिनेशन होणार नाही. आणि सगळं इमोशनल ड्रामा पार पडल्यानंतर बिगबॉसने सगळी हकीकत सदस्यांना सांगितली तेव्हा सगळ्यांना सुखद धक्का बसला आणि मेघा एलिमीनेट होण्यापासून वाचली!

आजच्या बिगबॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला “बाबा गाडी घराबाहेर काढी” हे नॉमिनेशन टास्क देणार मिळणार आहे. घरातील नवीन सदस्य त्यागराज, शर्मिष्ठा आणि घराची कॅप्टन मेघा ह्यातून सेफ असणार आहेत. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना एक बाबा गाडी देण्यात येणार आहे आणि त्यांना बेबीसीटरची भूमिका करावी लागणार आहे. या टास्कमधील बेबीसीटर त्यांना दिलेल्या बाहुल्या सांभाळतील. या बाबा गाडीमधील बाहुलीवर घरातील इतर सदस्यांचा फोटो असेल. म्हणजेच प्रत्येक सदस्य दुसऱ्या एका सदस्याचे प्रतिनिधित्व बाबा गाडीमध्ये घेऊन फिरतील.

सई ह्या टास्कमध्ये बाहुलीला गोष्ट सांगणार आहे ज्यामध्ये ती रेशमला डायन म्हणतांना दिसणार आहे. सई बाकी सगळ्यांना आवडते पण रेशमला आवडत नाही हे बाहुलीला सांगणार आहे. पुढे जुई आणि आस्तादमध्ये देखील थोडासा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्यात कोण सेफ राहतं आणि कोण एलिमीनेट होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top