Connect with us

मराठी कलाकार

सई आणि रेशममध्ये वाद! कोण होणार नवा कॅप्टन?

Television

सई आणि रेशममध्ये वाद! कोण होणार नवा कॅप्टन?

बिगबॉस मराठीचा शो आता झपाट्याने पुढे सरकत असून टास्कमागे टास्क घरातील सदस्यांना मिळतं असल्याचं आपल्याला हल्ली दिसतंय. कालपर्यंत घरात “अंडे का फ़ंडा” हे टास्क चालू होतं. ह्या टास्कमधील सुशांत आणि आस्ताद यांच्यात पुढील आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी चुरस रंगतांना आपल्याला दिसणार आहे. कालच्या टास्कदरम्यान स्मिता आणि मेघाच्या जोडीला फ्रेश फेस हे टायटल मिळाल्याचं आपण पाहिलं. घरामध्ये प्रसन्नता कायम राहावी म्हणून सदस्यांना बिगबॉस “फॉग मस्त दिवस जबरदस्त” हे टास्क आज देतांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन टीममध्ये सदस्यांची विभागणी होईल. जी टीम सर्वात जास्त प्रमाणात डिओ जमा करेल ती टीम इथे आपल्याला विजयी होतांना दिसेल.

सर्वांना सोपवलेलं आणखी एक टास्क “निरीक्षण परीक्षण” हे असून आपल्याला ह्यादरम्यान सई आणि रेशममध्ये वाद होतांना दिसणार आहे. काही शब्दांचे फलक सगळ्या सदस्यांना देण्यात येणार असून सदस्यांना घरातील त्यांच्या प्रतिमेवरून क्रमवारी ठरवायची आहे. “अति आत्मविश्वास” ह्या पहिल्याच फलकावरील शब्दाला सईने हा शद्ब रेशम टिपणीसला शोभत असल्याचं सांगितलं. रेशमने सुद्धा हे खोडून काढत मला असं वाटत नाही, आणि मी हे स्वीकारणार पण नाही असं सांगितलं. आता इथे सई आणि रेशममध्ये कसा वाद रंगतो आणि, कोणत्या सदस्याला कोणता शब्द मिळतो? हे बघणं रंजक असणार आहे. तसेच एक नवं कॅप्टन्सी टास्क सुद्धा बिगबॉस घरातील सदस्यांना आज देणार आहे. सत्कार मूर्ती असं ह्या टास्कचं नाव आहे. तेव्हा आता या आठवड्यात घरातील नवा कॅप्टन कोण बनतं हे पण पाहताना रंजक येणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top