Connect with us

मराठी कलाकार

बाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडण!तर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2

बिग बॉस मराठी

बाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडण!तर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा पहिला आठवडा तर छान गेला आणि या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याने सगळे खूश होते. वीकेंड ‘अनसीन अनदेखा’च्या वूटवरील क्लिपमध्ये काही निराळेच समोर आले आहे. त्या-त्या दिवसाचा गेमप्लान ठरवण्यासाठी दररोज एक तास द्यावा अशी चर्चा करताना पराग, किशोरी आणि रूपाली दिसत आहेत आणि वीणाही त्यांच्यात सामील झाली आहे.

दुसरीकडे विना आणि बाप्पा आपल्याला जोरदार भांडत असतांना दिसून आले. बाप्पा तू काड्या लावतो, आगलावे पण करतोस असं वीणाचं म्हणणं होतं तर दुसरीकडे तुला जे माझ्याबद्दल बोलायचं आहे ते तू माझ्या तोंडावर बोल माघारी नको बोलत जाऊ असं बोलतं बाप्पा चांगलेच तापलेल्या अवतारात आपण पहिले. तर दुसरीकडे शिवानी, बिचुकले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळणार आहे. अभिजीत बिचुकले त्यांच्या बोलण्यातून कधी कधी गोष्टीत गंमत आणण्याचा प्रयत्न करतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे.

आज अशीच एक गंमतीशीर गोष्ट किचनमध्ये घडणार आहे. रुपाली भोसले किचनमध्ये जेवण बनवताना कुकर मध्ये पाणी जास्त झाले आणि ते बाहेर येऊ लागले, यालाच अभिजित बिचुकले यांनी स्वत:शी जोडले कि कुकरला माझे बोलण सहन झाल नाही तर तुला कस होईल त्यावर शिवने देखील अभिजित बिचुकले यांवर एक टोंबणा मारला कि, “तुमच्या बोलण्यावर धिंगाणा झाला तर जिथे तुम्ही बोलता काय ना काय होतं” त्यावर बिचुकले यांनी देखील शिवला उत्तर देताना म्हंटले “प्रेशर कुकर असून देखील त्याला माझे प्रेशर सहन होत नाही तर माणसांना कसं होईल ?

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top