Connect with us

उषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी!

Television

उषा नाडकर्णी होतायत बिगबॉस मराठी मध्ये सहभागी!

अनेक चर्चा, बातम्यांना वाव देत बिगबॉस मराठी येत्या 15 एप्रिल पासून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. असं असलं तरीही सहभागी कलाकारांची नावं मात्र अद्यापही कळू शकलेली नाहीत. प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, गौरी सावंत ह्या सिलिब्रिटीजनी तर आधीच आपला सहभाग असल्याचं नाकारलं आहे. लवकरच बिगबॉसचा भव्य प्रीमिअर आपल्याला बघायला मिळणार आहे तोवर जरी आपल्याला सर्व सहभागी कलाकारांची नावं समजणार असली तरी सध्या एक मोठं नाव ह्या शोमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आहे.

उषा नाडकर्णी

हे मोठं नाव दुसरं तिसरं कुणी नसून पवित्र रिश्ता फेम ऍक्टरेस उषा नाडकर्णी आहे. हो! उषा नाडकर्णी आपल्याला बिगबॉस च्या घरात जाताना दिसणार आहेत. नुकतंच त्यांनी स्वतःच्या सहभागाविषयी बोलतांना माहिती दिली. ह्यावेळी त्या म्हणाल्या कि अशा आगळ्यावेगळ्या शोचा भाग होतांना थोडं दडपण येतंय कारण ह्यात माझ्या वयाचे कलाकार नसणार आहेत.

3 महिने विना मोबाईल फोन राहणार का? असा प्रश्न विचारला गेल्यावर आपल्याला मोबाईलचं व्यसन नसल्याने त्यावाचून राहणं आपल्याला अवघड जाणार नाही असेही त्या म्हणाल्या.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Television

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top