Connect with us

बिगबॉस मराठी लॉन्च सोहळा

Television

बिगबॉस मराठी लॉन्च सोहळा

महाराष्ट्रात संगीत, नाच, किंवा इतर धर्तीवर आधारित कित्येक रिऍलिटी शोज् वाहिन्यांवर येऊन गेले. पण यापेक्षा सर्वात वेगळा असा आणि 92हुन अधिक देशांत पर्व गाजवलेला ‘बिग बॉस’ प्रथमच मराठीत प्रेक्षकांसाठी भेटीस येतो आहे. हिंदी तामिळ, तेलगू असे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये पार पडलेल्या बिगबॉसचं मराठमोळं रूप ह्या 15 एप्रिलपासून चाहत्यांना कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे. आत्ताच बिग बॉस मराठीचा लॉंचिंग सोहळा सर्व टीमच्या उपस्थितीत पार पडला. शोची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये ह्यातील सहभागी मराठी ऍक्टर्सबद्दल तसेच सूत्रधाराबद्दल उत्सुकता होती. महेश मांजरेकर हे बिगबॉस मराठीचे सूत्रधार असून 15 कलाकारांवर कॅमेऱ्यातून ते पाळत ठेवतील.


अनेक भाषांमध्ये दमदार सिझन्स गाजवल्यानंतर बिगबॉसने एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. आता बिगबॉसची टिम हेच आव्हान मराठीत घ्यायला तयार झाली आहे. बिगबॉसच्या घरातील सर्व सदस्यांमध्ये समन्वय राखायला जबाबदार आणि अनुभवी होस्ट असायला हवा होता, महेश मांजरेकर हि जोखीम पेलताना आपल्याला दिसणार आहेत. सलमान खान, कमल हसन, सुदिप, एनटीआर सारख्या दिगग्ज लोकांनी हा शो होस्ट केलेला असल्याने आपल्याला पूर्वतयारी करणं थोडं अवघड चालल्याचं ह्यावेळी महेश मांजरेकर म्हणाले.

सहभागी कलाकार 25 ते 65 वयोगटातील असून संपूर्ण घरातील सदस्यांना हा शो पाहता यावा हा यामागचा उद्देश आहे. बिग बॉसच्या घरामध्ये 15 कलाकारांचा 100 दिवसांचा प्रवास आपल्याला अनेक पाळत ठेऊन असलेल्या कॅमेऱ्यातून दिसणार आहे. इतर स्पर्धकांनी नॉमिनेट केल्यानंतर कुण्या एका स्पर्धकाला बाहेर पडावं लागणार असून शेवटपर्यंत जो कलाकार ह्या घरात टिकेल तोच ठरेल बिगबॉस मराठीचा विजेता!

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Television

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top