Connect with us

मराठी कलाकार

महेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो!

Television

महेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो!

‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या बातम्यांना उधाण आलेलं आहे. बिगबॉस ने चाहत्यांच्या भेटीस येण्याआधीच वातावरण ‘बिगबॉस’मय केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. नुकताच शोची थीम दाखविणारा एक प्रोमो कलर्स मराठीने लॉन्च केला आहे. प्रोमोमध्ये आपल्याला ‘बिगबॉस मराठी’ होस्ट महेश मांजरेकर दिसत आहेत. ‘जगभरात खळबळ माजवणारा, भारतात हुकूमत गाजवणारा, अनेक राज्यांत चर्चा रंगवणारा… तो येतोय आपल्या मराठीत राडा घालायला!’ असा भारी प्रोमो महेश मांजरेकर त्यांच्या वजनदार आवाजात देताना दिसत आहेत.

सध्या टीव्हीवर कित्येक रिऍलिटी शोज आले आणि गेले पण ‘बिगबॉस’ने मात्र त्यात आपली एक वेगळी जागा निर्माण केलीये. ह्यामुळेच कि काय सलग ११ दमदार सीझन्स बिगबॉस ने हिंदी मध्ये पार पाडले. ११वा सिझन संपता संपता ‘बिगबॉस मराठी’ची घोषणा केली गेली. पुढे मग हा शो मराठीत कोण होस्ट करेल ह्यावरून चर्चेचा बाजार तेजीत आला. रितेश देशमुख, शिल्पा शिंदे अशी नाव रेस मध्ये असताना महेश मांजरेकरांनी हि बाजी मारली आणि ते बनले ‘बिगबॉस मराठी’ चे होस्ट. आता शोची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. १५ एप्रिल पासून कलर्स मराठीवर आपल्याला बघता येईल. सहभागी स्पर्धकांची नावं  जरी अजून कळू शकली नसली तरी आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Comments
Continue Reading
Advertisement

More in Television

To Top