Connect with us

मराठी कलाकार

बिचुकलेना केलं जातंय टार्गेट?तर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी

बिग बॉस मराठी

बिचुकलेना केलं जातंय टार्गेट?तर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता दुस-या सीझनमध्ये ही आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच घरात भांडणांना सुरुवात झालेली पाहायला मिळतेय. सध्या ‘बिग बॉस मराठी’मधील टास्क अगदी जोमात आहेत. असे वाटते की, स्‍पर्धकांनी गटबाजी करण्‍यास सुरूवात केली आहे. या सीजनच्‍या पहिल्‍या टास्‍कसाठी घरातील सदस्‍यांना दोन टीम्‍समध्‍ये विभागण्‍यात आले. एका टीमचे नेतृत्‍व अभिजीत बिचुकले आणि दुसऱ्या टीमचे नेतृत्‍व वैशाली माडेकडे सोपवण्‍यात आले. पराग कान्‍हेरे व माधव देवचके हे किशोरी शहाणे विज, अभिजीत केळकर, विद्याधर जोशी आणि सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्‍या क्रॉस-ड्रेसिंग टास्‍कबाबत चर्चा करताना दिसले.

सगळ्यात उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे आज कळणार आहे. याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. अभिजित बिचुकले यांच्या टीम मधून नेहा आणि वैशाली म्हाडेच्या टीम मधून शिव यांना कॅप्टनसीची उमेदवारी देण्यात आली आहे. घरातील सदस्य कोणाला देणार पहिला कॅप्टन बनण्याचा मान आज कळेल. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एकापेक्षा एक कलाकार असल्यामुळे कधी गाण्याची मैफल रंगते तर कधी स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतात. तर सुरेखाताई कधी लावणी आणि त्यातील अदा शिकवताना दिसतात. आज बिग बॉसच्या घरामध्ये सुरेल अंताक्षरी रंगणार आहे.

दुसरीकडे शिवानी आणि बिचुकले यांच्यातील वाद मिटण्याची काहीच चिन्हे दिसत नसून शिवानी पुन्हा बिचुकले यांच्यावर ओरडतांना आपल्याला दिसली. कपडे व्यवस्थित यावरून ठेवा म्हणत तिने बिचुकलेना धारेवर धरलं. जोवर तुम्ही रूम व्यवस्थित ठेवत नाही तोवर मी बाहेरून लॉक लावून तुम्हाला आत कोंडून ठेवेल असंही पुढे ती म्हणालेली आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळालं.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top