Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉस मराठी १५ एप्रिल पासून भेटीला। महेश मांजरेकर करतायत होस्ट

महेश मांजरेकर बिग बॉस मराठी

Television

बिगबॉस मराठी १५ एप्रिल पासून भेटीला। महेश मांजरेकर करतायत होस्ट

‘बिगबॉस चाहते है’ हे वाक्य कानावर पडताच काहीतरी औत्सुक्याचं घडणार हे निश्चित! आता आपल्याला हे मराठीत ऐकायला तयार व्हावं लागणार आहे. हो! कारण कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘बिगबॉस मराठी’ १५ एप्रिल पासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मराठी कलाकारांबद्दल जाणून घ्यावं अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आता ह्या निमित्ताने ती पूर्ण होईल असं दिसतंय. वाद आणि बिगबॉस हे समीकरण जुळणारं असल्याने मराठी सेलिब्रिटीजनां सुद्धा ह्यातून जावं लागणार आहे.

महेश मांजरेकर बिग बॉस मराठी

शोचे होस्ट हे महेश मांजरेकर असणार आहेत. ब्रिटिश शो ‘बिग ब्रदर’ची हिंदी आवृत्ती असलेला बिगबॉस चांगलाच हिट आहे. पुढे तामिळ, कन्नड, तेलगू ह्या प्रादेशिक भाषांमध्ये सिझन्स गाजवल्यानंतर ‘बिगबॉस’ मराठीत यायला तयार झाला आहे. एक घर, त्यात सहभागी असलेले बिगबॉसचे सेलिब्रिटी स्पर्धक आणि काही काळापुरता त्यांना ह्याच घरात सीसीटीव्ही निगरानीत बंद केलं जाईल. पुढे त्यांच्यात होणारे वादविवाद, भांडणं. त्यांना कधी प्रेमाने तर कधी स्पष्ट शब्दांत सूचना देणारा बिगबॉस लवकरच हे सगळं आपल्या मराठी प्रेक्षकांना मायबोलीत अनुभवता येणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top