Connect with us

मराठी कलाकार

मेघा बनली टार्गेट! मैत्रीच्या त्रिकुटात का रे दुरावा?

Television

मेघा बनली टार्गेट! मैत्रीच्या त्रिकुटात का रे दुरावा?

बिगबॉसच्या घरात सध्या राहिलेत ते केवळ सहा सदस्य! ह्या सहांमधून आठवड्याच्या शेवटी अजून एका सदस्याला घरची वाट दाखवल्या जाणार आहे. त्यामुळे आता टॉप 5 मध्ये नेमके कुठले पाच जण असणार ह्याविषयी फॅन्समध्ये चर्चा रंगल्या आहेत. सध्या घरात बिगबॉस कोर्ट हे टास्क सुरु असून सध्याच्या घडीला ह्या टास्कमध्ये पुष्कर जज बनला असून आस्ताद वकील बनला आहे. ह्यावेळी मेघा आरोपीच्या कठड्यात उभी असतांना तिची चांगलीच उलटतपासणी घेऊन तिला पुन्हा टार्गेट बनवण्यात आलं. सुरुवातीला सई, मेघा आणि पुष्कर हे मैत्रीचं त्रिकुट घरात होतं. पण शेवटच्या आठवड्यात ह्यांच्या मैत्रीत फूट पडत चाललेली आपल्याला सध्या दिसते आहे.

कोर्टरूम मध्ये मेघाला टार्गेट होण्याचं कारण असं कि, विकेंडचा डाव मध्ये महेश मांजरेकर ह्यांनी घरातील प्रत्येक सदस्याला त्याच्यासोबत कोणता एक स्पर्धक अंतिम सोहळ्यात बघण्याची इच्छा आहे असं विचारलं होतं. ह्यावेळी बऱ्याच सदस्यांनी त्यांच्या आवडीच्या सदस्याचं नाव घेतलं ह्यात सईने पुष्करचं तर पुष्करने मेघाचं नाव घेतलं होतं. पण मेघाने ह्यावेळी मात्र शर्मिष्ठाचं नाव घेत त्यांना धक्का दिला. त्यामुळे सई आणि पुष्कर मेघावर नाराज असल्याचं आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळालं.

त्यावर बोगबॉस कोर्टात स्पष्टीकरण देतांना मेघा म्हणाली कि “सई आणि पुष्कर सुरुवातीपासूनच टॉप 5 च्या शर्यतीत आहेत ह्यात शर्मिष्ठाचं नाव मात्र कुठेच नव्हतं म्हणून आपण तीच नाव घेतलं.”

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top