Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉसच्या मनात मोठा प्लॅन? तर रेशम म्हणते राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या!

Television

बिगबॉसच्या मनात मोठा प्लॅन? तर रेशम म्हणते राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या!

बिगबॉस मराठी मध्ये सध्या तडक्यावर तडके लागताना आपल्याला दिसत आहेत. नुकतीच घरातून बाहेर पडलेली रेशम सध्या बऱ्याच माध्यमांना मुलाखती देत तिचं म्हणणं मांडत आहे तर दुसरीकडे बिगबॉसच्या मनात ह्या लास्ट नॉमिनेशन आणि एलिमिनेशन साठी काहीतरी भन्नाट प्लॅन तर नाहीत ना? चला तर जाणून घेऊया!

हाती असलेल्या काही बातम्यांवर नजर टाकली तर असा अंदाज लावला जाऊ शकतो कि मराठी बिगबॉसमध्ये सुद्धा आपल्याला “मॉल टास्क” पाहायला मिळू शकतो. हिंदी बिगबॉसच्या शेवटच्या भागांदरम्यान हा टास्क आपल्याला पाहायला मिळाला होता. नावाप्रमाणेच हा टास्क इंटरेस्टिंग असून फॅन्सना खूप एण्टरटेन करेल ह्यात शंकाच नाही. ह्या टास्कमध्ये असतं काय तर नॉमिनेट स्पर्धकांना एका मॉल मध्ये नेल्या जातं तिथे असलेल्या चाहत्यांना ते वोटिंगसाठी अपील करू शकतात. बॅलेट पद्दतीने चाहत्यांच्या मतदानाने कोण ग्रँडफिनाले मध्ये आणि कोण बाहेर हे ठरवल्या जातं. आणि हे टास्क मराठी बिगबॉसमध्ये होण्याची शक्यता सध्या आहे कारण, ह्या आठवड्यात सर्व फोनलाईन्स बंद ठेवण्यात आल्या आहेत. थोडी वाट पाहिल्यानंतर पुढील भागांत आपली शंका दूर होईल.

रेशम देतेय माध्यमांना मुलाखती!

बिगबॉसमधून बाहेर पडलेली रेशम टिपणीस सध्या बऱ्याच माध्यमांना मुलाखती देत आहे. ह्या दरम्यान महत्वाच्या मुद्यांवर बोलतांना रेशम म्हणाली कि “घरात जे 24 तास घडलं ते दाखवलं गेल्या नसून बऱ्याच गोष्टी सर्वांसमोर आल्या नाहीत. सई आणि पुष्करची दोस्ती हा त्यांच्या पर्सनल विषय असून मी यावर जास्त विचार केला नाही आणि लक्षही दिलं नाही. राजेश आणि आपण चांगले मित्र आहोत. राजेशला बायको, मुलं असून त्याला त्याच्या लिमिट्स आहेत. घराबाहेर पडल्यावर ते जेव्हा बघितलं तेव्हा राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या असं वाटलं.”

Comments

More in Television

To Top