Connect with us

मराठी कलाकार

बॉईज-३ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला. लवकरच करण्यात येणार अधिकृत घोषणा.

News

बॉईज-३ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला. लवकरच करण्यात येणार अधिकृत घोषणा.

नुकताच ‘आम्ही लग्नाळू’ फेम ‘बॉईज’ सिनेमाचा सीक्वल चित्रपटगृहात दाखल झाला असून पहिल्या भागाप्रमाणेच ‘बॉईज 2’ला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा तिसरा भाग देखील बनवण्यात येत असल्याचं कळतं आहे. 2017 साली रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘बॉईज’ ने तीन शालेय मित्रांचे विश्व रेखाटले होते. तदनंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आणि नुकताच ‘बॉईज’चा सीक्वल चित्रपटगृहात दाखल झाला.

सदर सिक्वेल मध्ये महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व दाखवण्यात आले आहे. या सिनेमात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड, जयंत वाडकर, गिरीश कुलकर्णी, सायली पाटील यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रेम आणि रोमान्स चित्रपटात पाहायला मिळाला तरी आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील सिनेमात पाहायला मिळतो आहे. आता सूत्रांकडून ‘बॉईज 2’ सिनेमानंतर ‘बॉईज 3’ देखील येणार असल्याचे समजते आहे. ‘बॉईज 3’चे कथानक वेगळे असणार असून यावेळेस तरूणींवर आधारीत कथानक असल्याचे समजते आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top