Connect with us

मराठी कलाकार

‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर

Movie Trailers

‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर

माधुरी दिक्षितला पडद्यावर पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. बराच वेळ ग्लॅमरपासून दूर असलेली माधुरी आता लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीस येनार आहे. नुकताच तिच्या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. बकेटलिस्ट असं सिनेमाचं नाव असून ह्या सिनेमाद्वारे माधुरी प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे. ट्रेलरवरून तर सिनेमा हमखास आपलं पैसावसुल मनोरंजन करणार असंच दिसतंय. खुद्द करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनद्वारे हे ट्रेलर सोशली लॉन्च केलं.

ट्रेलर म्हणजे सिनेमाची पहिली झलक आणि त्याबाबत बोलायचं झाल्यास माधुरीच्या बकेट लिस्ट ची पहिली झलक अतिशय जबरदस्त वाटते. चौघांच्या आवडीच्या चार भाज्या बनवणारी घरातील सर्वसामान्य एक गृहिणी. आई, बहीण, मुलगी, बायको,मैत्रीण अशा सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे पेलणाऱ्या महिलेच्या भुमिकेत माधुरी दिक्षित आपल्याला दिसते. सुमित राघवन माधुरीसोबत मुख्य भुमिकेत झळकताना आपल्याला दिसत आहे. सिनेमातील कॉमेडी, डान्स, धमाल, मस्ती, सुख दुःखाचे क्षण ट्रेलरमधून आपल्याला बघायला मिळतात. बकेटलिस्ट म्हणजे इच्छा आकांक्षा असलेली एक लिस्ट. आणि सिनेमातील सईची बकेटलिस्ट पूर्ण करतांना आपल्याला माधुरी बघायला मिळते. ह्यावेळी ती बाईक चालवणे, हिंडणे फिरणे, धमाल करतांना दिसते. पुढे ट्रेलरमध्ये असलेलं मोठ्ठ सरप्राईज म्हणजे एका सीनमध्ये रणबीर कपूरचा सुद्धा स्पेशल अपिरन्स आहे. “दारू पिणे से यकृत विकृत होता है” हा गाजलेला डायलॉग आपल्याला माधुरीच्या तोंडून ऐकायला मिळतो.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top