Connect with us

मराठी कलाकार

गटारी स्पेशल “चला हवा येऊ द्या!”

Television

गटारी स्पेशल “चला हवा येऊ द्या!”

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही लोकं इतर सणांपेक्षा गटारी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. त्यामध्ये ‘चला हवा येऊ द्या’चे विनोदवीर कसे मागे राहतील?

“चला हवा येऊ द्या” च्या मंचावर या आठवड्यात वन्स मोर आणि बाबा या चित्रपटातील कलाकार सज्ज झाले आहेत. त्यामुळे धमाल मजा मस्ती या बरोबरच थुकरटवाडीत आलेल्या या कलाकारांसोबत गटारीचं सेलिब्रेशन देखील तितक्याच जोशात होणार होतं.

सुप्रसिद्ध सिनेमा “कर्ज”ने रसिकांची मन जिंकून घेतली होती. तर आता दुसरीकडे थुकरटवाडी मेड “कर्जबाजारी” हा नवा सिनेमा आपल्याला ‘चला हवा येऊ द्या’च्या भागात बघायला मिळणार आहे. कारण आलेल्या पाहुण्या मंडळींसाठी थुकरट वाडीतील विनोदवीर कर्ज या सिनेमावर आधारित विनोदी स्किट सादर करणार आहेत. या सिनेमात कुशल बद्रिके कामिनीची भूमिका साकारणार असून भाऊ कदम मॉन्टी हि भूमिका साकारणार आहे.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top