Connect with us

मराठी कलाकार

थुरकटवाडीचा धमाल ‘माझा वट्टा’! पहा व्हीडिओ.

Television

थुरकटवाडीचा धमाल ‘माझा वट्टा’! पहा व्हीडिओ.

चला हवा येऊ द्याच्या या आठवड्यातील भागांत आपल्याला तुफान मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. आणि अर्थातच त्याला कारणंही तसंच आहे. चला हवा येऊ द्या मधील थुरकटवाडीत आपण आजवर अनेक दिग्गज सेलिब्रिटीजची मांदियाळी बघितलेली आहे. त्याचप्रमाणे या आठवड्याच्या भागात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हजेरी लावणार आहेत. ‘एक निर्णय’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुबोध भावे या भागात दिसणार असून सई ताम्हणकर तिच्या झी फाईव्ह वरील डेट विथ सई या वेबसिरीजच्या निमित्ताने झळकणार आहे.

गेला आठवडा केवळ एका शाही लग्नाच्या चर्चेने गाजला. विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकिशा यांचं शाही लग्न हा चर्चेचा विषय होता. त्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीजना बोलावलं नाही म्हणून बॉलिवूडच्या कलाकारांनी निषेध व्यक्त करताना आपल्याला चला हवा येऊ द्याच्या या आठवड्यातील भागांत बघायला मिळणार आहे. सर्व बॉलिवूडचे कलाकार थुकरटवाडीत ‘माझा वट्टा’ या कार्यक्रमात येणार आहेत. विनोदवीर एकच कल्ला करणार आहेत त्यामुळे प्रेक्षक हसून लोटपोट होणार हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर विकिशाच्या धम्माल मिम्स
एकीकडे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला विकिशाचा विवाहसोहळ्याबद्दल दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर नेटिझन्सकडून विकीशाच्या लग्नाची खिल्ली उडवणारे मिम्स आणि विनोदांचा भडिमार सुरु आहे.

Comments

More in Television

To Top