Connect with us

मराठी कलाकार

आता प्रेक्षकांच्या मनासारखं करू। विश्व् दौरा फसलाच। भाऊ कदम, कुशलची कबुली।

chala hawa yevu dya

Television

आता प्रेक्षकांच्या मनासारखं करू। विश्व् दौरा फसलाच। भाऊ कदम, कुशलची कबुली।

तुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात जागा करून गेलेला एक शो, महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोचलेला एक शो पोचला आहे ज्याचं नाव आहे ‘चला हवा येऊ द्या’. सध्या ह्या शो चे विश्व दौऱ्याचे काही स्पेशल भाग प्रसारित होत आहेत. खरं बघायला गेलं तर आजवर ह्या शो च्या विनोदवीरांनी महाराष्ट्राला मनमोकळेपणे हसवलं आहे. पण हल्ली प्रेक्षकांचा ओघ ह्या कार्यक्रमाकडे पहिलेसारखा राहिलेला दिसत नाही. त्याच कारण म्हणजे हवी तशी होत नसलेली विनोद निर्मिती, आणि कामाचा दर्जा. पण आता हि चूक कलाकारांना कळलेली आहे आणि त्यांनी ती मान्य सुद्धा केल्याचं दिसतंय. चला हवा येऊ द्या चा विश्व् दौरा फसल्याचं स्वतः कुशल बद्रिकेने मान्य केलं आहे. भाऊ कदम याविषयी बोलताना म्हणाले कि प्रेक्षकांनी आम्हाला एका चौकटीत पाहिलं आहे आणि त्यांना साचेबद्धपणाची सवय झाली होती. त्यामुळेच कदाचित त्यांना हा बदल पसंतीस आला नाही. पण प्रेक्षकांना हवंय तसेच आम्ही त्यांच्या समोर येऊ कारण हा शो शेवटी त्यांच्याच साठी आहे.

Chala hawa yeu dya

Chala hawa yeu dya

नुकतंच एका मुलाखतीत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या विषयी बोलत होते. होत असलेली चूक त्यांनी मान्य केली आणि परत असं होऊ देणार नाही अशी खबरदारी घेऊ असंही ते म्हणाले. प्रेक्षक मायबापानी पाठीवर हात ठेऊन फक्त लढा म्हणाव अशी विनंतीही त्यांनी केली. ज्यांनी आम्हाला डोक्यावर घेतलं त्यांना आमच्याकडून विनोद निर्मिती होत नसेल तर तसं सांगण्याचा पूर्ण हक्क असल्याचं कुशल म्हणाला. महाराष्ट्र दौरा नंतर मग भारत दौरा ह्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून ‘चला हवा येऊ द्या’ ने विश्व् दौरा केला होता पण तो प्रयत्न मात्र फसल्याचंही तो म्हणाला. थोडा वेळ द्या आमच्या चुका सुधारून परत आम्ही नव्या जोमाने ‘चला हवा येऊ द्या’ करू असं दोघांनी म्हटलंय.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top