Connect with us

मराठी कलाकार

‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.

Actor

‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.

झी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार हात होणार आहेत. मागील ४ फेब्रुवारीलाच विनीतचा साखरपुडा त्याच्या मित्रांसमवेत घरगुती समारंभात औरंगाबाद येथे संपन्न झाला. विनीतचं लग्न हे अरेंज्ड मॅरीज असून घरच्यांच्या संमतीने या दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. विनितच्या होणाऱ्या बायकोचं नाव सोनम पवार असून ती मुळची सोलापूरची आहे. सोनम सध्या पुण्यात नर्सिंगचं शिक्षण घेत आहे. येत्या ४ मार्चला विनीत लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याचं कळतंय. मोजक्याच नातेवाईक आणि मित्रांसमवेत विनीतने साखरपुडा उरकुन घेतला आहे.

आता विनीत बद्दल थोड्याचं शब्दांत बोलायचं झालं तर ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असंच म्हणावं लागेल. विनीतने चला हवा येऊ द्या या शो मध्ये कधी लहान मुलगा, कधी प्रोफेसर तर कधी हवालदार अशा एक ना अनेक भुमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. विनीत हा मुळचा औरंगाबादचा असून त्याच्या घरी आईवडील, भाऊ, वहिनी, पुतणे हि मंडळी आहेत. विनितच्या एका भावाचं नाव विशाल तर दुसऱ्याचं नाव विपुल असं आहे. मागील दहा वर्षांपासून विनीत टीव्ही, सिनेमा, रंगभूमी या माध्यमातून आपल्याला दिसला आहे. आणि ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमातून त्याची सुरु झालेली कारकीर्द आजही घौडदौड करतेच आहे. अशा ह्या गुणवान कलाकाराचं आमच्या ‘मराठी कलाकार टिम’ कडून हार्दिक अभिनंदन!

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actor

To Top