Connect with us

मराठी कलाकार

‘ह्या’मराठी अभिनेत्याला मिळालं क्रिकेटर वडिलांची भुमिका साकारण्याचं भाग्य.

Featured

‘ह्या’मराठी अभिनेत्याला मिळालं क्रिकेटर वडिलांची भुमिका साकारण्याचं भाग्य.

हल्ली ‘एटी थ्री’ हा रणवीर सिंगचा सिनेमा बराच चर्चेत आहे. भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा ‘८३’ हा सिनेमा आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे. या संघात जे खेळाडू होते त्यांच्या भूमिका साकार करण्यासाठी सध्या कलाकारांची निवड केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमातील एका-एका क्रिकेटरच्या व्यक्तिरेखेवरुन पडदा उचलण्यात येतो आहे.

साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार असून दाक्षिणात्य अभिनेता जीवा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका वठविणार आहे. पहिल्यांदाच वडिलांची कारकीर्द रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी एका अभिनेत्याला मिळत आहे कारण संदीप पाटील ‘८३’च्या क्रिकेट टीमचा महत्त्वाचा भाग होते. आणि सिनेमात त्यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे.

आतापर्यंत जवळपास 11 मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये चिराग पाटीलने काम केले आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता ‘८३’ सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. ‘८३’ हा सिनेमा एप्रिल २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Featured

To Top