Connect with us

भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित।पहा ट्रेलर

Movie Trailers

भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित।पहा ट्रेलर

सायकल वर आधारित एक भावपूर्ण कथा आगामी सायकल हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेमाचं ट्रेलर नुकतंच युटयूबवर लॉन्च करण्यात आलं आहे. बराच वेळेपासून प्रदर्शनाच्या अनेक तारखा बाजूला सारत सिनेमा शेवटी या ४ मे पासून सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरहून सिनेमा पारिवारिक आणि भावून जाणारा आहे असंच वाटतंय. सिनेमांत ह्रिषिकेश जोशी, भालचंद्र कदम, प्रियदर्शन जाधव यांच्या महत्वाच्या भुमिका आहेत. सायकल हा प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात गेलेला सिनेमा आहे.

प्रकाश कुंटे हे सिनेमाचे दिग्दर्शक असून, निर्मिती संग्राम सुर्वे, अमर पंडित यांची आहे. सिनेमाची कथा अदिती मोघे यांनी लिहिली आहे. हॅपी माईंड एन्टरटेनमेन्ट प्रा. लिमिटेड प्रस्तुत हा सिनेमा असून त्याला आदित्य बेडेकर ह्यांच संगीत लाभलं आहे. जरा हटके आणि कॉफी आणि बरचं काहीसारखे दोन भावणारे सिनेमे चाहत्यांना दिल्यानंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटे हे त्यांच्या आगामी तिसऱ्या सिनेमासोबत तयार आहेत. सायकल नाव असलेला हा सिनेमा थोडासा कॉमेडी तसंच भावस्पर्शीसुध्दा आहे. येत्या ४ मे पासून सिनेमा प्रदर्शित होतं आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top