Connect with us

मराठी कलाकार

“दादा, मी प्रेग्नन्ट आहे”चे होर्डिंग्स आणि प्रिया बापटच्या गुड न्यूजचं ‘हे’आहे सिक्रेट.

News

“दादा, मी प्रेग्नन्ट आहे”चे होर्डिंग्स आणि प्रिया बापटच्या गुड न्यूजचं ‘हे’आहे सिक्रेट.

तीन चार दिवसांपूर्वी प्रिया बापट आणि उमेश कामात या दोघा नवराबायकोंनी गुड न्यूज आहे या आशयासह इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. हि गुड न्यूज कुठली याविषयी उत्सुकता लागलेली असतांनाच दुसरीकडे पुण्या-मुंबईत “दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” लिहिलेले होर्डिंग्स झळकत होते. आता या दोन्ही गोष्टींबाबतचं सत्य आपल्या समोर आलं असून धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रिया बापटची गुड न्यूज आणि “दादा, मी प्रेग्नन्ट आहे”चे होर्डिंग्स यांचा घट्ट संबंध असल्याचं कळतं आहे.

‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, हे होर्डिंग एका नाटकाच्या प्रमोशनचं आहे. प्रिया बापट नाट्यरसिकांसाठी “दादा, एक गुड न्यूज आहे” हे नवंकोरं नाटक घेऊन येत आहे. या नाटकाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे हे जोडी भाऊ-बहिण म्हणून दिसणार आहे.उमेश ह्या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.

काही दिवसांपासून दादरच्या प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वे रोडच्या डेक्कन टी पॉईंट इथे ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, हे होर्डिंग पाहायला मिळत आहे. या होर्डिंगमागचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यातच प्रिया बापटने चार दिवसांपूर्वी ‘एक गुड न्यूज आहे,’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामुळे प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चां रंगू लागल्या होत्या. पण आता यानिमित्ताने चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

 

Comments

More in News

To Top