Connect with us

मराठी कलाकार

“दे धक्का-२”लवकरच येणार भेटीला.पहा Exclusive पोस्टर.

Upcoming Movies

“दे धक्का-२”लवकरच येणार भेटीला.पहा Exclusive पोस्टर.

मराठी सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी असून ‘दे धक्का’ सिनेमाचा ‘दे धक्का २’ हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. अतुल काळे आणि सुदेश मांजेकर दिग्दर्शित ‘दे धक्का’ चित्रपट १६ मे २००८ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमेय खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलाईन एंटरटेनमेंट निर्मित ‘दे धक्का २’ हा ३ जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी ‘दे धक्का २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ही महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

‘दे धक्का’ चित्रपटावर २००६ साली ऑस्करच्या शर्यतीत असणाऱ्या ‘लिटिल मिस सनशाइनचा’ या चित्रपटाचा प्रभाव आहे. ‘दे धक्का’ या चित्रपटाची कथा ही जाधव परिवाराची होती. या जाधव परिवारा समोर अनेक अडचणी येत असतात. त्या सर्व अडचणीवर एकत्र कुटुंब मात करताना पाहायला मिळाले आहे. तसेच यामध्ये एका नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जाताना प्रवास दाखवला होता. ‘दे धक्का’चा रिमेक कन्नडमध्ये चित्रपटामध्ये ‘क्रेझी कुटुंब’ करण्यात आला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजेकर यांनी ‘दे धक्का २’ या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये लंडनच्या रस्त्यावर एका बंद पडलेल्या काळ्या गाडीत शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि मेधा मांजरेकर बसलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी या चित्रपटाचे चित्रीकरण हे लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Popular Posts

To Top