Connect with us

मराठी कलाकार

साऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.

Movie Teaser

साऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.

सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या ‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर जबरदस्त ऍक्शन सिन्स करताना दिसत असल्याने सोशल मिडीयावर या टीझरची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटात भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, रोहन पाटील, साक्षी चौधरी, विशाल निकम, कृतिका गायकवाड, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू दक्षिणेतील नामांकित तंत्रज्ञांनी सांभाळली असून सामाजिक वास्तव दाखवणारा हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पी. शंकरम यांचे संगीत लाभले असून सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांनी चित्रपटातील गीते गायली आहेत तर चित्रपटाचे गीतकार अविनाश काळे आहेत. हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आणि प्रभावी ऍक्शन सिन्स ‘धुमस’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

Comments

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top