Connect with us

मराठी कलाकार

पहा ‘डोक्याला शॉट’चा हा भन्नाट टिझर.मिका सिंगचे मराठीत पदार्पण.

Movie Teaser

पहा ‘डोक्याला शॉट’चा हा भन्नाट टिझर.मिका सिंगचे मराठीत पदार्पण.

नुकताच ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. ‘अ व्हिवा इन एन प्रॉडक्शन’ शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे.यात गणेश पंडित, सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. यावरून हा सिनेमा मैत्री, प्रेम, लग्न या विषयवार आधारित आहे, याचा अंदाज येतो.याआधीही ‘लग्न आणि मैत्री’ या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोक्याला नक्कीच शॉट देईल.

तरूण पिढीला लग्नाच्या आधी आणि नंतर वाटणारी भीती, हुरहूर, तणाव, जबाबदारी याचे दर्शन या टिझरमधून घडत आहे. तरुणांची ही स्थिती दिग्दर्शकाने अतिशय रंजक आणि मार्मिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ज्यांचे लग्न होणार आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहे, अशा प्रत्येक जोडप्याला हा चित्रपट स्वानुभवाची जाणीव करून देईल.दोन भिन्न भाषिक लग्न करणार असल्याने मित्रांना वेगळीच चिंता सतावत असल्याचेही टिझरमध्ये दिसत आहे.सिनेमात सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, गणेश पंडित यांच्यासह रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि सुमन साहू चित्रित हा सिनेमा १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळणार आहे आणि ते म्हणजे बॉलीवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा गायक मिका सिंग या चित्रपटाच्या शीर्षक गीताला आपला आवाज देणार आहे. उत्तुंग ठाकूर यांना या उडत्या चालीच्या आणि मस्ती मूड अशा गाण्याला मराठी सृष्टीत आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज पाहिजे होता. म्हणून त्यांनी मिका सिंग यांचे नाव अमितराज यांना सुचवले.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top