Connect with us

मराठी कलाकार

रसिकांना पाण्याचं महत्व सांगतोय आगामी सिनेमा ‘एक होतं पाणी’.पहा अनोखं पोस्टर

News

रसिकांना पाण्याचं महत्व सांगतोय आगामी सिनेमा ‘एक होतं पाणी’.पहा अनोखं पोस्टर

नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा मराठी सिनेसृष्टीत दिवसागणिक रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव ‘एक होतं पाणी’ असं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती भीषण बनत चालली आहे. काही दुष्काळग्रस्त भागात तर दोन वेळचा खाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.

या सिनेमातून एक नवा चेहरा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्रीचे नाव श्रिया मस्तेकर असं आहे. श्रियाच्या डबिंगचं काम पूर्ण झाल्याची माहिती लेखक आशिष निनगुरकर यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळचा एक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोत आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे आणि अभिनेत्री श्रिया मस्तेकर पाहायला मिळत आहे. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, आशिष निनगुरकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, वर्षा पाटणकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.

Comments

More in News

To Top