Connect with us

मराठी कलाकार

शिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट। आगामी फर्जंद मराठी सिनेमा

Movie Trailers

शिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट। आगामी फर्जंद मराठी सिनेमा

महाराष्ट्राला इतिहासाची उजवल परंपरा लाभली आहे. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शिवकालीन पराक्रमी मावळे हे चाणाक्ष योद्धेसुद्धा होते पण ह्या गोष्टीवर हवा तेवढा प्रकाश पडू शकला नाही. आगामी चित्रपट फर्जंद च्या निमित्ताने आपल्याला हे सर्व पाहता येणार आहे. शिवरायांच्या मावळ्यांचे शौर्य आणि झुंझारपणा हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न ह्या सिनेमाद्वारे होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून त्यावरून हा सिनेमा मराठीतलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रसृष्टीतला पहिला युद्धपट आहे असं दिसतंय. फर्जंद सिनेमातून महाराजांच्या ६० पराक्रमी वीरांनी लढलेल्या अद्वितीय लढाईची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. केवळ ६० मावळ्यांच्या भरवश्यावर हा अवघड असा पन्हाळा किल्ला जिंकला होता. फर्जंद ह्या धाडसी वीर मावळ्यावर महाराजांनी ती जबाबदारी सोपवली होती. आणि ‘आता फकस्त लढायचं…आपल्या राजासाठी…अन स्वराज्यासाठी’ असं म्हणत मुठभर मावळ्यांसमवेत ती पारही पाडण्यात आली.

सिनेमाची प्रस्तुती ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची असून अनिरबान सरकार ह्यांची निर्मिती आहे. शिवाजी महाराजांच्या भुमिकेत आपल्याला चिन्मय मांडलेकर दिसत असून अंकित मोहन ह्या कलाकाराने कोंडाजी फर्जंद साकारले आहेत. ह्याव्यतिरिक्त सिनेमात प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मृन्मयी देशपांडे, राजन भिसे, अंशुमन विचारे, समीर धर्माधिकारी हे कलाकार बघायला मिळणार आहेत. कलादिगदर्शन नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच असून उत्कर्ष जाधव हे कार्यकारी निर्माते आहेत. सिनेमाची गीते क्षितिज पटवर्धन आणि दिगपाल लांजेकर ह्यांची असून आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत ह्यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. ज्वलंत इतिहासाची पुन्हा आठवण करून देणारा हा फर्जंद येत्या 1 जूनपासून प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top