Connect with us

मराठी कलाकार

पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.

News

पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा होतोय लॉस अँजेलिस मध्ये शूट.वाचा अधिक.

सिनेमात नवनवे प्रयोग करणं मराठी इंडस्ट्रीला हल्ली नवं नाही राहिलं. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी नव्या फळीचे निर्माते दिग्दर्शक घेताना दिसताहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही आहेत. आशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख चढता आणि गौरवशाली राहिला आहे.

मराठी चित्रपटांचा आशय-विषय, तांत्रिक कौशल्य आणि निर्मीतीमूल्य पाहून मराठी चित्रपटनिर्मितीसाठी अनेकजण स्वारस्य दाखवित असतानाच घडणारी उल्लेखनीय गोष्टम्हणजे ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. या निमित्ताने एक मानाचा तुरा मराठी चित्रपटांच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.

‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीतला ‘हेमलकसा’ असे संवेदनशील विषय रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. हिंदीत एकाहून एक सरस कार्यक्रमांची निर्मिती केल्यानंतर मराठीत आपलं वेगळपण दाखवून देण्यासाठी ‘साईबाबा स्टुडिओज’चे शिवकुमार उत्सुक होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी वाट चोखाळत प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याच्या उद्देशाने हे दोघेजण एकत्र आले आहेत. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top