Connect with us

मराठी कलाकार

फोर्ब्सच्या ‘३० अंडर ३०’ च्या यादीत झळकल्या मराठी तारका!

News

फोर्ब्सच्या ‘३० अंडर ३०’ च्या यादीत झळकल्या मराठी तारका!

नुकतंच जगप्रसिद्ध अशा फोर्ब्सने ‘फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३० हि यादी जाहीर केली आहे. आणि यात आपल्या मराठमोळ्या कलाकार, अभिनेत्रींचे नावं आहेत हे विशेष. फोर्ब्सने जाहीर केलेल्या या यादीत कप सॉन्ग फेम मिथिला पालकर आणि भुमी पेडणेकर यांची नावं आली आहेत. मिथिला हि ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘मुरांबा’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, तर तिच्या कप सॉन्ग मुळे तर तीची एक वेगळीच ओळखसुद्धा आपल्याला निर्माण झाली आहे. आणि भुमी बद्दल तर काय बोलायचं? ती सुद्धा याआधी आपल्याला ‘दम लगा के हैश्या’, ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटांद्वारे भेटलेलीच आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या या यादीमध्ये क्रीडा ,उदयोग, चित्रपट, मनोरंजन या क्षेत्रातील ‘अंडर 30’ असलेल्या लोकांचा उल्लेख आहे.

या यादीमधील इतरांच्या बाबतीत बोलायचं झालंच तर यामध्ये ‘ओके जानू’ मधील ‘हम्मा’ सॉन्ग फेम गायक जुबीन नैतियाल सुद्धा आहे. तसेच आपल्या महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू असलेली हरमनप्रित कौर पण यादीत आहे. पुरुष क्रिकेट संघातील खेळाडू जसप्रित बुमराह सुद्धा आहे. पिस्तुल शुटर हिना सिद्धूसोबतच हॉकी गोलकीपर सविता पुनियाचं पण नाव आहे.

मिथिला पालकर विषयी थोडंस

Mithila Palkar

मिथिला पालकरने याआधी ‘गर्ल इन द सिटी’ या वेब सिरीज मध्ये काम केलं आहे. पहिल्यांदा ती सगळ्या जगासमोर आली ते तिच्या व्हायरल झालेल्या यूट्यूब व्हीडिओमुळे. तिचं ‘हि चाल तूरु तूरु’ हे कप सॉन्ग प्रेक्षकांना चांगलंच आवडलं. तसंच ती याआधी स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘महाराष्ट्र देशा’ या जाहिरातीमध्ये सुद्धा दिसली होती. पुढे २०१४ मध्ये मिथिलाने सिनेमांमध्ये काम करायचं ठरवलं. आणि ‘माझा हनिमून’ तिची पहिली शॉर्टफिल्म होती. हे सोडलं तर मिथिलाने हिंदी चित्रपट ‘कट्टी बट्टी’ मध्ये काम केलेलं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मिथिलाचं ‘हि चाल तूरु तूरु’ हे कप सॉन्ग तुम्ही यूट्यूब वर सर्च करून बघू शकता. तुम्हालाही ते नक्कीच आवडेल!

Mithila Palkar

Mithila Palkar

 

थोडी माहिती भुमी पेडणेकर विषयी...

Bhumi Pednekar

अभिनेत्री भुमी पेडणेकर मुळची मुंबईची. यशराज फिल्म्स मध्ये तिने सुरुवातीला असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. २०१५ मध्ये तिने अभिनेत्री म्हणून ‘दम लगा के हैश्या’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी होता. मागच्या वर्षीचं ती अक्षय कुमारसोबत ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ मध्ये आपल्याला दिसली आहे. तसंच तिने ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटामध्ये पण काम केलेलं आहे. आणि याहूनही सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ती ‘६३ व्या फिल्मफेअर अवोर्ड’ साठी बेस्ट एक्टरेस च्या शर्यतीतसुद्धा भुमी राहिलेली आहे.

Bhumi Pednekar

Bhumi Pednekar

Comments
Continue Reading
Advertisement

More in News

To Top