Connect with us

मराठी कलाकार

अर्जुन कपूर आणि गश्मीर महाजनी झळकणार “ह्या”भव्य सिनेमात एकत्र!वाचा अधिक.

Featured

अर्जुन कपूर आणि गश्मीर महाजनी झळकणार “ह्या”भव्य सिनेमात एकत्र!वाचा अधिक.

आपल्या एक से बढकर एक भुमिकांमुळे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने रसिकांवर चांगलीच जादू केली आहे. ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळबंद’, ‘कान्हा’, ‘वन वे तिकिट’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतरित्या गश्मीरने वाजवलं आहे. काही दिवसांपूर्वी गश्मीर एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत गश्मीर सेटवर केप कापताना दिसतोय. व्हिडीओला गश्मीरने कॅप्शनदेखील दिले आहे. त्यावरुन गश्मीरची वर्णी आशुतोष गोवारिकर यांच्या पानीपत सिनेमात लागल्याचे कळतेय. यात नेमका गश्मीर कोणती भूमिका साकारतोय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पानिपतच्या युद्धावर आधारित ह्या सिनेमाची कथा असून गश्मीरसह संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे. तर पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे. ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

यावर्षाच्या सुरुवातीलच गश्मीरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. आपल्या बाळासोबतचा एक फोटो त्यांने सोशल मीडियावर शेअर करून ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top