Connect with us

मराठी कलाकार

“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.

Actor

“हि”सर्व संकटं पेलून यशस्वी झालाय गश्मीर महाजनी.

“देऊळबंद” सिनेमात राघव शास्त्री हि जबरदस्त भुमिका वठवणारा अभिनेता गश्मीर महाजनी. यासमवेत तो ‘कान्हा’, ‘वन वे तिकिट’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’,’कॅरी ऑन मराठा’ या मराठी सिनेमातून झळकलेला आहे. तसेच गश्मीरने हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. पण एक मिनिट…त्याच्या ह्या सिनेसृष्टीत येण्याच्या प्रवासामागचं कारण तुम्हाला माहितीये का? गश्मीर महाजनी या क्षेत्रात आला तो त्याच्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे! हो! हो! हे अगदी खरं आहे.

एका चॅट शो दरम्यान बोलतांना गश्मीरने मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली होती. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याविषयी तो सांगतो, “माझ्यासाठी अभिनय ही गरज होती. मी १५ वर्षांचा होतो तेव्हा आमच्यावर मोठे आर्थिक संकट आले. आमचे पुण्यातील घर सील झाले. माझ्या वडिलांचा व्यवसाय ठप्‍प झाला होता. कोणीच त्याबाबत काहीच करू शकत नव्हते. तेव्हा त्यावेळी काम करणे ही गरज होती. वयाच्या १५ व्या वर्षी मी माझी स्वत:ची डान्स इन्स्टिट्यूट सुरू केली. दोन वर्षांच्या काळात ही इन्स्टिट्यूट मोठी झाली. मग मी इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. आणि त्या काळापासून म्हणजे मी २१ वर्षांचा होतो, तेव्हापासून सगळ्या कर्जांची परतफेड केली. प्रत्येक नकारात्मक गोष्टीतून काहीतरी सकारात्मक घडते. हे काहीसे असे आहे. वयाच्या १७ व्या वर्षी बीएमसीसी कॉलेजमध्ये प्राप्तीकर भरणारा मी एकटाच विद्यार्थी होतो”.

एमएक्‍स प्‍लेयर या स्ट्रीमिंग सर्व्हिस सध्या घेऊन आले आहे “फेमसली फिल्मफेअर” या आपल्या प्रमुख आकर्षण असलेल्या चॅट शोची स्थानिक आवृत्ती. या शो मध्ये गश्मीर झळकणार आहे.

Comments

More in Actor

Like Us on Facebook

Popular Posts

To Top