Connect with us

मराठी कलाकार

अवधूत गुप्तेंचा रॉकिंग अंदाज ‘गॅटमॅट होऊ देना’.

Video Songs

अवधूत गुप्तेंचा रॉकिंग अंदाज ‘गॅटमॅट होऊ देना’.

बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आगामी ‘गॅटमॅट’च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार असून सर्वांना तालावर थिरकवणारे त्यांचे ‘गॅटमॅट होऊ देना’ हे सिनेमाचे टायटल सॉंग नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. सचिन पाठक लिखित ‘गॅटमॅट होऊ देना’ या गाण्याला समीर साप्तीस्करने चाल दिली आहे. अवधूत गुप्तेंच्या चाहत्यांसाठी हे गाणे खऱ्या अर्थाने रॉकिंग ठरत आहे.

प्रेमाची गुलाबी छटा एका नव्या ढंगात मांडणारा ‘गॅटमॅट’ हा सिनेमा प्रेमी जोडप्यांसाठी खास असणार असून कॉलेज विश्वातील सळसळत्या तरुणाईला आकर्षित करणारे हे गाणे साऱ्यांनाच रिफ्रेश करून जाते. येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तरुणाईने बहरलेल्या या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठीतील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून सदर सिनेमा अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती आहे.

Comments

More in Video Songs

To Top