Connect with us

मराठी कलाकार

ईशाच्या पात्राविरुद्ध भुमिका साकारतेय गायत्री दातार.करतेय सिनेमात पदार्पण.

News

ईशाच्या पात्राविरुद्ध भुमिका साकारतेय गायत्री दातार.करतेय सिनेमात पदार्पण.

विक्रांत सरंजामे व ईशा या जोडीला हल्ली महाष्ट्रात कोण ओळखत नसेल ना? “तुला पाहते रे” ह्या छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या मालिकेने विक्रांत आणि ईशा हि पात्र चांगलीच गाजली. विक्रांत सरंजामेची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारतो आहे तर ईशाची भूमिका अभिनेत्री गायत्री दातार करते आहे. आणि आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.

गायत्री दातार ‘कोल्हापूर डायरिज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सुपरहिट मल्याळम चित्रपट ‘अंगमली डायरीज’चा मराठी रिमेक आहे. ”कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटामध्ये मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मुलीचे पात्र साकारले आहे. ती इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. आता मालिकेतील माझी भूमिका पाहता सगळे मला ईशा म्हणून ओळखतात पण चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षक मला अगदीच वेगळ्या भूमिकेत पाहणार आहेत. मालिकेतील ईशा जशी साधी आहे तसे चित्रपटातील माझी भूमिका त्याविरुद्ध असणार आहे.” असं या चित्रपटाबद्दल गायत्री दातारने मराठी बॉक्स ऑफिस या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

View this post on Instagram

Mountains have played a major role in shaping my personality and in making me the person I am today! Their sheer size and strength have made me realise that I am a very small creature on this vast planet! Everytime I go meet them…they make me realise my strengths and accept my weaknesses so that I can work on them! Also can’t forget to mention the never give up attitude they have gifted me! Coming to meet you soon!🎈 I love you♥️ #majormissinghappening #randomappreciationpost #Mountains #HimachalPradesh #IncredibleIndia #BasicMountaineeringCourse #4layersofclothes #throwback #gratitude #thankyou #love #IshaNimkar #GayatriDatar #TulaPahateRe #ZeeMarathi #Marathiactress #Actress #keeptheloveandsupportgamestrong❤️

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

‘कोल्हापूर डायरिज’ चित्रपटात गायत्री दातारसोबत भूषण नानासाहेब पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे. तर संगीतकार अवधूत गुप्ते या चित्रपटाचा सादरकर्ता आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुला पाहते रे या मालिकेत ईशाची भूमिका साकारुन गायत्रीने प्रेक्षकांची अल्पावधीतच मन जिंकली आहेत. हि मालिका टीआरपीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसते.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top