Connect with us

मराठी कलाकार

रणवीरच्या आईची भूमिका साकारतेय”हि”मराठमोळी अभिनेत्री!

Actress

रणवीरच्या आईची भूमिका साकारतेय”हि”मराठमोळी अभिनेत्री!

सध्या सगळीकडे रणवीर सिंग आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाची दोन पोस्टर्स रिलीज झाली असून, आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. दरम्यान, ‘गली बॉय’ चित्रपटात एक मराठी चेहरा झळकणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र, आता हा चेहरा कोण याचा उलगडा झाला आहे. मराठमोठी अभिनेत्री अमृता सुभाष ‘गली बॉय’ चित्रपटात झळकणार आहे. अमृता सुभाष या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूडचा सध्या आघाडीचा हिरो असलेल्या रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत अमृता सुभाषला पाहणं, ही प्रेक्षकांसाठीही वेगळी बाब ठरणार आहे. अमृताने सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास खूप मजा आली असे अमृताने पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करत आहे. या चित्रपटातील तिची बहुतेक दृश्य ही रणवीर सोबत चित्रीत करण्यात आली आहेत.

आलिया आणि रणवीर यानिमित्तामे प्रथमच एकत्र काम करत असून झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट ‘गली बॉय’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top