Connect with us

मराठी कलाकार

एक लढा पाण्यासाठी.”H2O कहाणी थेंबाची”सिनेमाचा पोस्टर आऊट. 

Upcoming Movies

एक लढा पाण्यासाठी.”H2O कहाणी थेंबाची”सिनेमाचा पोस्टर आऊट. 

पाणीटंचाई, पाणपोई, वरतून आग ओकणारा सूर्य हे सध्याच्या जमान्यातील उन्हाळ्याचं चित्र. आजच्या काळात तर ऋतू कोणताही असो पाण्याची कमतरता ही कायमच जाणवते. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित ‘H2O कहाणी थेंबाची’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. भेगा गेलेल्या जमिनीतून दोन तरुण मुलांचे आक्रमक चेहरे आणि मागील बाजूस एकत्रित आलेली तरुणाई दिसत आहे.
पाण्याच्या एका थेंबाचे महत्व सांगणाऱ्या या चित्रपटात अशोक.एन.डी , सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शितल अहिरराव, किरण पाटील हे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मिलिंद पाटील यांनी केले असून सुनील झवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमधील तडा गेलेल्या जमिनीवर मोजकेच पाण्याचे थेंब दिसत आहेत. हे मोजकेच थेंबही तरुणाईला प्रोत्साहन देणारे आहे. म्हणूनच चित्रपटाच्या टॅगलाइन मध्ये ‘कहाणी थेंबाची’ म्हटले आहे.
यानिमित्ताने अतिशय गंभीर विषयावर आधारित ‘H2O कहाणी थेंबाची’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असे म्हटले जाते, की तिसरे महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल. पण, जर आपल्याला भविष्यात होणारी  ही भीषण स्थिती थांबावायची असेल तर आतापासूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. असा काहीसा सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट आहे. येत्या १२ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होत असून त्याची निर्मिती जी. एस. प्रोडक्शनने केली आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Upcoming Movies

To Top