Connect with us

मराठी कलाकार

“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप?

Television

“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप?

झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यासोबतच या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे अंजली अर्थात सर्वांची लाडकी पाठक बाई आणि राणादा या दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. मात्र या मालिकेसंदर्भात वेगळ्याच चर्चा रंगताना दिसत आहे. कारण या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार असून मालिकेच्या सेटवरील काही फोटो लिक झाल्यानंतर या मालिकेविषयी जोरदार चर्चा होतांना दिसतेय.

कोणत्याही संकटाला बिनधास्त सामोरे जाणारा राणादा एका मोठ्या संकटात अडकल्याचे समजत आहे. काही लिक झालेल्या काही फोटोमुळे राणादाचा मालिकेत मृत्यू होणार असल्याची चर्चा रंगतेय. जर असेच झाले तर राणादाचे पात्र पुन्हा मालिकेत दिसणार की नाही. या पात्राचा मालिकेतील प्रवास इथेच थांबणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यासोबतच, नुकताच मालिकेत एक फाईट सीन शूट झाला असून त्यावेळी राणादाला बेदम मारण्यात आले. यानंतर राणादा म्हणजेच हार्दिक जोशी शुटिंग संपवून मुंबईत परतला. त्यामुळे राणादा मालिकेमधून एक्झिट घेणार असल्याची चर्चा देखील तेवढीच रंगली आहे.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top