Connect with us

मराठी कलाकार

घाडगे&सून मालिका रंजक वळणावर.लवकरच “ह्या”दमदार पात्राची मालिकेत एंट्री.

Television

घाडगे&सून मालिका रंजक वळणावर.लवकरच “ह्या”दमदार पात्राची मालिकेत एंट्री.

घाडगे & सून मालिकेमध्ये सध्या संपूर्ण घाडगे कुटुंब कियाराच्या कारस्थानांनी आणि डावपेचांनी त्रस्त झाले आहे. या सगळ्यामध्ये अमृता आणि माई मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी कियाराची खेळी मात्र सगळ्यांना भारी पडत आहे. तिचा खोटेपणा, गरोदर आहे असं सांगण, घाडगे परिवाराला तिच्या वडिलांनी ब्लॅकमेल करण, धमक्या देण. यात कियाराने अक्षयला आपण भारताच्या बाहेर जाऊ कायमचे घाडगे सदनाला सोडून असं सांगण आणि त्यामुळेच अक्षय द्विधा मनस्थिती असण अशा गोष्टी सध्या मालिकेत घडत आहेत.

पण, पण, पण लवकरच मालिका एक रंजक वळण घेणार असून सौदामिनी नावाच्या पात्राची एन्ट्री लवकरच मालिकेत होणार आहे. आणि सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणे रंजक असणार आहे. हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत. अक्षय आणि कियारा घर सोडून दुबईला जाणार हे सत्य अमृता आणि घरच्यांना देखील समजले आहे. अमृता यासगळ्यामधून काय आणि कसा मार्ग काढेल हे बघणे रंजक असणार आहे. हे घडत असतानाच मालिकेमध्ये सौदामिनीच्या एन्ट्रीमुळे काय घडेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

सौदामिनी आणि घाडगे कुटुंबाचा काय संबंध आहे ? कियाराचा हा डाव तर नाही ना ? येत्या भागांमध्ये सौदामिनी घाडगेंना इंटरोगेट का करणार आहे ? सर्व घाडग्यांना सौदामिनी नजरकैदेत ठेवणार ? सौदामिनीला पुरुषांविषयी विशेष चीड आहे, त्यामुळे कियाराच्या खोट्या बोलण्यामध्ये येऊन ती अक्षय आणि घाडग्यांना जबाबदार धरणार का ? अमृता यामधून कशी मार्ग काढेल ? असले एक ना अनेक प्रश्न सध्या चाहत्यांना पडले असून याची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील भागांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top