Connect with us

मराठी कलाकार

“ही”जोडी एकमेकांना डेट तर करत नाही ना?पहा फोटोज.

Gossips

“ही”जोडी एकमेकांना डेट तर करत नाही ना?पहा फोटोज.

स्वयम आणि अमरजा या ऑन स्क्रिन ‘अशी ही आशिकी’ सिनेमातील जोडीची भूमिका साकाराणारे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट तर करत नाहीयेत ना? असाच प्रश्न हल्ली फॅन्सना पड्लेला आहे. त्याचं झालं असं कि लवकरच स्वयम आणि अमरजाची ‘अशी ही आशिकी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आणि ही नवीन जोडी सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान जरा जास्तच एकत्र रुळली, त्यांच्या हावभावातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेस असं कुठेही जाणवत नाही.

सध्या दोघेही या विषयावर काही बोलू इच्छित नसल्यामुळे खरं काय ते अजून कळलेलं नाही. परंतु, प्रमोशन दरम्यान अभिनय आणि हेमलमध्ये तयार झालेली जवळीक यामुळे आणि त्यांचे काही फोटोस् व्हायरल झाल्यामुळे ते डेट करत आहेत अशी चर्चा रंगत आहे. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री ही उत्तम जुळली आहे आणि त्यांची आशिकी पाहिल्यावर प्रत्येकजण म्हणेल की वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम करणारी ‘अशी ही आशिकी’! खऱ्या आयुष्यात खरंच ते दोघं एकमेकांसोबत आशिकी करण्याच्या बेतात आहे की नाही हे अजून तरी कळले नाही.

मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असेच सध्या बोलले जातेय. येत्या १ मार्चला स्वयम आणि अमरजाची ‘अशी ही आशिकी’ सिनेमागृहात रसिकांच्या भेटीस येणार आहे.

 

Comments

More in Gossips

Like Us on Facebook

Popular Posts

To Top