Connect with us

मराठी कलाकार

“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री!पहा फोटोज.

बिग बॉस मराठी

“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री!पहा फोटोज.

गत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या घरात मानसिक त्रास होत असल्याची शिवानीने तक्रार होती. अखेर महेश मांजरेकरांनी तिला बॅग भरुन यायला सांगितले आणि शिवानी घराबाहेर गेली. ती बाहेर गेली आणि एका नव्या सदस्याने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. काल अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. वीकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिनाचे नाव जाहिर केले आणि हिनाची स्टेजवर धमाकेदार एन्टी झाली.

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा समावेश होता. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

‘माधवचा मला खूप अभिमान आहे’- माधव देवचक्केचे वडील

बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेची त्याच्या चाहत्यांमध्ये इमेज ‘समंजस’ बिग बॉस कन्टेस्टंट अशी आहे. आणि त्याच्या वडिलांनीही फादर्स डे निमित्ताने त्याची पाठ थोपटलीय. ‘फादर्स डे’ निमित्ताने माधवचे वडिल चारूदत्त देवचके म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती.”

“मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने स्विकारली नाही.”

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top