Connect with us

मराठी कलाकार

थरारक ‘जजमेंट’ सिनेमाचा टिझर पोस्टर.तेजश्री प्रधान,मंगेश देसाई झळकणार एकत्र.

Upcoming Movies

थरारक ‘जजमेंट’ सिनेमाचा टिझर पोस्टर.तेजश्री प्रधान,मंगेश देसाई झळकणार एकत्र.

काहीतरी रोमांचक, काहीतरी थरारक, आपल्याला मराठी सिनेमातून बघायला मिळणार आहे याचं ‘जजमेंट’ आपण लावू शकतो. कारण काही दिवसांपूर्वीच ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नावावरूनच हा थरारपट असणार याचा अंदाज बांधला जात असतानाच आता या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच झाले. पोस्टरमध्ये स्विमिंगपूलच्या बाजूला रक्त पडलेले दिसत आहे. या ठिकाणी नेमके काय घडले आहे, हे जाणण्यासाठी मात्र प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून समीर रमेश सुर्वे यांचे दिग्दर्शन आहे. ‘जजमेंट’ या चित्रपटाची कथा निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ कादंबरीवर आधारित आहे.

तेजश्री प्रधान म्हणते “प्लीज नो सेल्फी.”

मालिकेत दिसणारे कलाकार प्रत्यक्ष भेटावेत, त्यांच्याबरोबर सुसंवाद साधता यावा इतकेच काय तर आताच्या जीवनशैलीप्रमाणे एखादा सेल्फीही टिपता यावा, असे या प्रेक्षकांना वाटत असते. होणार सून मी या घरची या मालिकेतली जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटाबरोबर आता ती नाटकातही काम करते आहे. दोन तास एखाद्या भूमिकेशी एकरूप झाल्यानंतर भेटायला येणारा प्रेक्षक त्याविषयी फारसे काही बोलत नाही. एखाद्या सेल्फीसाठी प्रेक्षकाचा हा सगळा खटाटोप आहे का असे तिला वाटायला लागलेले आहे. प्लीज नो सेल्फी असेही कधीतरी म्हणावेसे वाटते. संजय मोने यांच्या कानाला खडा या चॅट शोमध्ये तिने आपली खंत व्यक्त केलेली आहे.

Comments

More in Upcoming Movies

To Top