Connect with us

मराठी कलाकार

आर्चीच्या बहुचर्चित “कागर”सिनेमाचा टीझर काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल.

Movie Teaser

आर्चीच्या बहुचर्चित “कागर”सिनेमाचा टीझर काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल.

नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा बहुचर्चित असलेला कागर सिनेमाचा टीझर काही तासांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राजकारणातील प्रवेश करण्यापूर्वीचे आयुष्य आणि त्यानंतर झालेल्या बदलाची छोटीशी झलक या १ मिनिट २१ सेकंदांच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

‘तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार कागर’ अशा ओळीतून या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरूची ओळख करुन देण्यात आली आहे. कागरच्या टीझरमध्ये दोघांचे प्रेम बहरत असताना रिंकूच्या प्रियकराचा मृत्यू होतो आणि त्यानंतर रिंकूचा राजकीय प्रवास या टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहतांना सैराटमधील आर्चीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटात रिंकूची प्रमुख भूमिका असून शुभंकर तावडेही तिच्यासह दिसणार आहे.

रिंकूचं हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अजून वाढली होती. टीझरवरून कागर चित्रपट प्रेमकथा आणि राजकारणावर आधारित असल्याचे दिसत आहे. प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसे वागावे याचे धडे देताना देखील दिसत आहे. सैराटमधील रिंकूच्या आवाजाचा बाज असल्यामुळे वेगळ्या विषयावरील सैराटचाच टीझर पाहतो की काय असा भास प्रेक्षकांना नक्कीच होईल यात शंकाच नाही.

Comments

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top