Connect with us

मराठी कलाकार

दमदार संवादाने भरलेल्या”कागर”सिनेमाचा ट्रेलर तुम्ही चुकवलात तर नाही?

Movie Trailers

दमदार संवादाने भरलेल्या”कागर”सिनेमाचा ट्रेलर तुम्ही चुकवलात तर नाही?

‘सैराट’ या मराठी सिनेमातील दमदार अभिनयाने देशा-परदेशात पोहचलेली रिंकू राजगुरू तीन वर्षांनी पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. ‘कागर’ या रिंकूच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रिंकू राजगुरू सोबत शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता पदार्पण करत आहे. कागर’च्या टीझर आणि सिनेमातील ‘लागिलिया गोडी तुझी’ या पहिल्या गाण्यानंतर रसिकांना ‘कागर’च्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. ग्रामीण राजकारण आणि प्रेम याच्या संघर्षात फुलणारी प्रेमकहाणी हा या सिनेमाचा आशय आहे.

सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहेत. जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायत. निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओज आपल्या भेटीला घेऊन येत आहे “कागर ” हा नवा चित्रपट. वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज – उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. एककीडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा “कागर” २६ एप्रिलपासून रुपेरी पडद्यावर दाखल होतोय. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. रिंकू या सिनेमात ‘राणी’ ही भूमिका साकारत आहे. ‘कधी कधी शर्यत जेथून सुरू होते तिथेच येऊन संपते’ या रिंकूच्या डायलॉगमध्येच या सिनेमाच्या कथेचा अंदाज येतो. अनपेक्षितपणे घरात राजकारणाचा वारसा असलेल्या राणीचा (रिंकू) राजकारणामध्ये प्रवेश होतो. राजकीय डावांमध्ये राणी आणि तिचा प्रियकर कुठल्या वळणावर येऊन ठेपतं याची झलक ट्रेलरमध्ये पाहता येते. रिंकूचा पुन्हा दमदार अभिनय, नवं स्वावलंबी स्त्री पात्र ‘कागर’ सिनेमात पाहता येणार आहे.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top