Connect with us

मराठी कलाकार

…यामुळेच कधी नट झालो नाही. दिग्दर्शक केदार शिंदेंचा दिलखुलास अंदाज.

News

…यामुळेच कधी नट झालो नाही. दिग्दर्शक केदार शिंदेंचा दिलखुलास अंदाज.

मराठी सिनेसृष्टीवर छाप सोडलेल्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे केदार शिंदे. ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘गलगले निघाले’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’ अशा विविध मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख केदार शिंदेनी निर्माण केली आहे. नुसते सिनेमेच नाही तर रंगभूमीवरही केदार यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ अशा अनेक नाटकांचा उल्लेख यांत करता येईल. याशिवाय हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे. हल्ली एका वाहिनीवरील टॉक शो मध्ये दिग्दर्शक केदार शिंदे आपल्याला दिलखुलास अंदाजात बघायला मिळाले. यावेळी त्यांनी आपण का नट झालो नाही आणि होणारही नाही याबद्दल बातचीत केली.

सदर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलेब्सला आरशासमोर उभं राहून स्वतःशी गप्पा माराव्या लागतात. त्याप्रमाणे केदार शिंदेनीही स्वतःशी दिलखुलास गप्पा मारल्या. ते म्हणाले “लेखक, दिग्दर्शक, निर्माता होशील असं कधीच वाटलं नव्हतं, मात्र जिद्द, मेहनत, चिकाटीमुळे यश मिळालं. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तू लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करत होतास. तेव्हा नट होण्याचं खूळसुद्धा डोक्यात होतं. त्यावेळी असाच आरशात उभा राहून चांगला नट होऊ शकतो का असा प्रश्न विचारला. तेव्हा मला खरं उत्तर दिलंस. तू याच क्षेत्रात राहा, नट होऊ नकोस असं मला सांगितलंस. त्यावेळी मला तुझा रागसुद्धा आला होता. मात्र आज जे काही करू शकलो, तेवढं नट होऊनही करू शकला नसतो”.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top