Connect with us

मराठी कलाकार

“बिगबॉस मराठी-२”सुरु होण्याआधीच केतकी माटेगावकरचा सर्वात मोठा खुलासा.

बिग बॉस मराठी

“बिगबॉस मराठी-२”सुरु होण्याआधीच केतकी माटेगावकरचा सर्वात मोठा खुलासा.

सध्याचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिअलिटी शो म्हणून ‘बिगबॉस’ ओळखला जातो. गेल्या वर्षी बिगबॉस हा शो मराठी भाषेमध्ये सुरू करण्यात आला होता. लोकांच्या अप्रतिम प्रतिसादानंतर शो निर्मात्यांनी बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. या शोच्या दुसऱ्या सीझनबाबत कलर्स मराठी वाहिनीने घोषणा केल्यानंतर या शोमध्ये कोणाची कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. अशाच वेळी कलर्स मराठीने ‘खूप चर्चा रंगली… आता अनाऊन्समेंटची वेळ झाली कारण तो परत येतोय. भेटूया उद्या सकाळी ८ वा’ असे ट्विट करत चर्चांना दुजोरा दिला होता.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या नावाचीदेखील चर्चा होती. मात्र याबाबत खुद्द तिनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. मी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही अफवा आहे. मोठ्या काळ चालणाऱ्या कार्यक्रमात यावर्षी सहभागी होण्याचा विचार नाही. ह्या शब्दांत केतकीने आपले मत मांडले आहे. केतकीच्या या पोस्टनंतर ती या सीझनमध्ये नसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

केतकीने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये सांगितले की, “बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची आता वेळ जवळ आली आहे. मला बिग बॉस पहायला आवडते आणि मी दुसरा सीझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही अफवा आहे. मोठ्या काळ चालणाऱ्या कार्यक्रमात यावर्षी सहभागी होण्याचा विचार नाही. या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना व संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट.” याआधी सुद्धा बिगबॉस मराठीमध्ये ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दिसणार असल्याची चर्चा होती.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top