Connect with us

मराठी कलाकार

‘घाडगे आणि सून’मधील कियाराचा नवा अंदाज दिसणार”ह्या”सिनेमात.

Actress

‘घाडगे आणि सून’मधील कियाराचा नवा अंदाज दिसणार”ह्या”सिनेमात.

सध्या टीआरपी रेटिंगबाबत बोलायचं झाल्यास ‘घाडगे आणि सून’ मालिका शर्यतीत चांगली कामगिरी करत असल्याचं दिसून येतं. ‘घाडगे आणि सून’ या मालिकेमधील अक्षय आणि अमृता इतकीच घरघरात पोहचलेली व्यक्तिरेखा म्हणजे कियारा. कियारा ही व्यक्तीरेखा निगेटीव्ह असल्यामुळे अनेकदा तीेने महिलावर्गाचा रागही ओढवून घेतला आहे. कियारा म्हणजे प्रतीक्षा मुणगेकरचा करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. आता लवकरच प्रतीक्षा तुम्हाला एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

Coming soon #🙏🏻😇

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

आगामी ‘बाबो’ या चित्रपटात प्रतीक्षा आणि अमोल कागणे एकत्र दिसणार आहेत. नटखट, प्रेमळ-लाघवी आणि तितकीच समंजस प्रतीक्षा श्रीमंत घराण्यातली आहे. तर अमोल हा मध्यम वर्गीय घरातला आहे. प्रतीक्षा मुणगेकर या नवोदित अभिनेत्रीने या आधी ‘विडा एक संघर्ष’ आणि ‘मातंगी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलेली आहे. शिवाय ‘कियारा’ हे तिचे सध्या गाजत असलेले पात्र सध्या अतिशय लोकप्रिय आहे. मल्हार फिल्म्स क्रिएशन्सचा ‘बाबो’ या चित्रपटातून अमोल आणि प्रतीक्षा यांची युथफूल जोडी आपल्यालाही प्रेमात पडेल अशीच आहे.

View this post on Instagram

Coming soon #🙏🏻

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ या चित्रपटात अमोल आणि प्रतीशची लव्हेबल केमिस्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी रोमँटिक ट्रीट असणार आहे. अमोल आणि प्रतिक्षाच्या प्रेमाला समाज मान्यता लाभणार का ? त्यांचं प्रेम यशस्वी होतं का ? घरच्यांचा विरोध श्रेष्ठ कि प्रेम ? हा खेळ गमतीशीर पद्धतीने ‘बाबो’ मध्ये मांडला आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top