Connect with us

मराठी कलाकार

अभिनेता के.के.मेननच्या अभिनयाची जुगलबंदी मराठीत. ‘एक सांगायचंय’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च.

Upcoming Movies

अभिनेता के.के.मेननच्या अभिनयाची जुगलबंदी मराठीत. ‘एक सांगायचंय’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च.

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित ‘एक सांगायचंय…….Unsaid Harmony’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून अभिनेता लोकेश विजय गुप्तेचा हा पहिलाच सिनेमा आहे. एक अत्यंत संवेदनशील कथा आपल्याला ह्या सिनेमाद्वारे बघायला मिळणार आहे. ह्या सिनेमातून आपल्याला बॉलिवूड अभिनेता केके मेनन मराठीत पदार्पण करतांना दिसणार आहे.

सिनेमाची निर्मिती देवी सातेरी प्रॉडक्शननं केली असून ट्रेलरमधून आताच्या तरूणपिढीचे प्रश्न मांडताना दिसत आहे. केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदींच्या मुख्य भूमिका आहेत. लोकेश विजय गुप्तेंन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. याविषयी अधिक बोलतांना अभिनेता के.के.मेनन यांनी सांगितल कि “महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते. या सिनेमासाठी मी खास मराठी शिकलो आणि त्यासाठी मला लोकेशची फार मदत झाली”. १६ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

To Top